Pune : हिल टॉप हिल स्लोप येथील अनधिकृत इमारतीवर कारवाई

एमपीसी न्यूज – हिल टॉप हिल स्लोप येथील (Pune) अनधिकृत इमारतीवर महापालिकेच्या बांधकाम नियंत्रण विभागाने अखेर बुधवार दिनांक 7 फेब्रुवारी 2024 रोजी कारवाई केली. एक जॉ कटर, चार जेसीबी, चार गॅस कटर, महापालिका मनुष्यबळगट एक, दोन पोलीस गट यांच्या साहाय्याने 29 अनधिकृत आस्थापना पाडण्यात आल्या. तसेच आई माता मंदिरा ते शत्रुंजय मंदिर रस्त्यावर पूर्व बाजू कडील बिबवेवाडी पोलीस चौकीच्या हद्दीतील भागात ही कारवाई करण्यात आलेली आहे.

महापालिकेची परवानगी न घेता बिबवेवाडीतील घाटमाथ्यावर अनेक व्यावसायिकांनी गोडाऊन, दुकाने, शोरूम आदींची अनधिकृत बांधकामे केली आहेत. संबंधित बांधकामधारकांना प्रशासनाने वारंवार नोटिसा दिलेल्या आहेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे प्रशासनाने परिसरात कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.
बिबवेवाडी येथील डोंगरमाथा परिसरात अनेक पक्की बांधकामे करण्यात आली आहेत. तसेच पत्राशेड, गोडाऊन उभारलेले आहेत. या अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

Tathawade : ताथवडे येथील नवीन अतिउच्च दाब उपकेंद्राला महावितरणची मंजूरी ; 85 हजार वीजग्राहकांना लाभ

शहर अभियंता प्रशांत वाघमारे, मुख्य अभियंता युवराज (Pune) देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. तसेच या प्रसंगी कार्यकारी अभियंता प्रकाश पवार, उपअभियंता शैलेंद्र काथवटे, शाखा अभियंता उमेश सिद्रुक, वंदना गवारी कनिष्ठ अभियंता, पियुष दिघे, ट्युलिप इंजिनीयर प्रथमेश देशपांडे, परीक्षित डोंगरे, जय ससाने या पथकाने सदर कारवाई योग्यरित्या पार पाडली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.