Pune : थुंकीबहाद्दरानंतर पालिकेचा मोर्चा आता कचरा करणाऱ्यांकडे 

एमपीसी न्यूज – स्त्यांवर थुंकणाऱ्यावर कारवाई केल्यानंतर आता महापालिकेने आपला मोर्चा सार्वजनिक ठिकाणी कचरा करणाऱ्यांकडे वळविला आहे. सोमवारपासून ही कारवाई सुरू केली जाणार असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख ज्ञानेश्‍वर मोळक यांनी दिली.

शहरातील भाजी मंडई, व्यावसायिक ठिकाणे, कचरा अधिक करणाऱ्या जागा, गर्दीची ठिकाणे, बसस्थानके अशा ठिकाणी व संबंधित कर्मचाऱ्यांनी तेथील नागरिक, व्यावसायिक यांना मार्गदर्शन करुन कचरा एकत्रिकरण, त्याचे नियोजन, स्वच्छ संस्थेच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती व नियोजन करत कचराबहाद्दरांशी चर्चा करुन कचरा निर्मूलन नियोजनाबाबत जागृती केली. त्याचबरोबर सार्वजनिक जागा, सार्वजनिक रस्ते यावर घाण न करता सार्वजनिक शौचालये, स्वच्छतागृहांचा वापर करण्याचे आवाहन केले जाणार असल्याचेही मोळक म्हणाले.

शहरात स्वच्छता मोहिमेअंतर्गत घनकचरा व्यवस्थापन विभागासह अन्य विभागही मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहेत. त्यासाठी महापालिकेचे अधिकारीही दररोज सकाळी शहर स्वच्छतेची तपासणी करत असतानाच, अनेक सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर कचरा टाकला जात असल्याचे तसेच अस्वच्छता केली जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अशा नागरिकांना आळा घालणे गरजेचे बनले असल्याने ही कारवाई करण्यात येणार असल्याचे मोळक म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.