Pune : अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांचे सोशल मीडिया अकाऊंट हॅक
एमपीसी न्यूज – पुण्यात अनेक बड्या अधिकाऱ्यां ( Pune) चे सोशल मीडिया अकाऊंट हॅक झाले आहे. मात्र, आता पुण्यातील सायबर क्राइम विभागाचे अतिरीक्त पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे यांचे सोशल मीडिया खातेच सायबर चोरट्यांनी हॅक केले आहे. दरम्यान, नागरिकांनी त्यांच्या या खात्याला प्रतिसाद देऊ नये असे आवाहन त्यांनी केले आहे.
शहरात सायबर गुन्हेगारीत वाढ झाली आहे. सायबर चोरटे अनेकांना लक्ष करून फसवणूक करत आहेत. या साठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर हे सायबर चोरटे करत आहेत. सायबर चोरट्यांनी गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पोकळे यांचे सोशल मीडियाचे खाते हॅक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
Mahalunge : कोयता घेऊन वृद्धाचा भर रस्त्यात धुडगूस; दोघांना दिली जीवे मारण्याची धमकी
पोकळे यांच्या नावाने काही परिचित, नागरिकांना चोरट्यांनी मैत्रीची विनंती पाठवला आहे. खाते हॅक केल्यानंतर चोरटे संदेश पाठवून नागरिकांची फसवणूक करण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करावे ( Pune) असे आवाहन त्यांनी केले आहे.