Pune: पुणे शहरातील अतिरिक्त निर्बंध पुढील आदेशापर्यंत शिथिल – डॉ. रवींद्र शिसवे

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील कोरोना अति संक्रमणशील क्षेत्रात 22 व 23 एप्रिल रोजी लागू केलेले अतिरिक्त निर्बंध पुढील आदेशापर्यंत शिथिल करणेत आले असून तेथे पूर्वीप्रमाणे मनाई आदेश दुकाने उघडी ठेवण्याच्या निर्धारित वेळेच्या बंधनांसह अंमलात राहतील, असे पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे आज काढलेल्या नवीन आदेशात म्हटले आहे. 

करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी शहरातील दहा पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील परिसरात 22 व 23 एप्रिल रोजी पूर्णपणे मनाई आदेश लागू केले आहेत. या काळात या ठिकाणी सकाळी दहा ते दुपारी 12 पर्यंत या वेळेत फक्त दूध विक्री करण्यास परवानगी देण्यात आली होती. या आदेशाचे मुदत आज मध्यरात्री 12 वाजता संपत आहे.

या क्षेत्रातील अतिरिक्त निर्बंध शिथिल 

परिमंडळ एक -समर्थ, खडक आणि फरासखाना पोलीस ठाण्याच्या अखत्यारित येत असलेला संपूर्ण परिसर.

परिमंडळ दोन – स्वारगेट  पोलीस ठाणे – गुलटेकडी, महर्षीनगर, डायसप्लाॅट, बंडगार्डन पोलीस ठाणे- ताडीवाला रस्ता

परिमंडळ तीन -दत्तवाडी पोलीस ठाणे- जनता वसाहत, पर्वती दर्शन परिसर, शिवदर्शन

परिमंडळ चार – येरवडा पोलीस ठाणे-लक्ष्मीनगर, गाडीतळ, खडकी पोलीस ठाणे- खडकी बाजार, कसाई मोहल्ला, पाटील इस्टेट झोपडपट्टी

परिमंडळ पाच – कोंढवा पोलीस ठाण्याचा संपूर्ण भाग, वानवडी पोलीस ठाणे- विकासनगर, सय्यदनगर, रामटेकडी,चिंतामणी नगर, वॉर्ड क्रमांक २४, हांडेवाडी, वॉर्ड क्रमांक २६ आणि २८.

पोलिसांनी सात व 14 एप्रिलला जाहीर केलेल्या प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये सकाळी दहा ते दुपारी 12 या वेळेत अत्यावश्यक वस्तूंची दुकाने उघडी ठेवता येणार असून 20 एप्रिलला जाहीर केलेल्या प्रतिबंधित क्षेत्रात सकाळी 10 ते दुपारी दोनपर्यंत अत्यावश्यक वस्तूंची दुकाने उघडी ठेवता येणार आहेत, असे आदेशामध्ये म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.