Pune: भीमाशंकर परिसरात यावर्षी पर्यटनास बंदी, प्रशासनाचा निर्णय

Pune: Administration bans tourism in Bhimashankar area this year due to corona पर्यटकांना श्री क्षेत्र भीमाशंकर, कोढंवळ धबधबा आणि डिंबे धरण याठिकाणी पर्यटनासाठी जाता येणार नाही.

एमपीसी न्यूज- कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर यावर्षी भीमाशंकर परिसरात प्रशासनाकडून पर्यटनास बंदी घालण्यात आली आहे.

पुणे ग्रामीण पोलिसांनी याबाबत ट्विटर वरुन माहिती दिली आहे. घोडेगाव पोलिसांनी याबाबत पर्यटकांना आवाहन करताना असे म्हटले आहे की, कोरोना विषाणूच्या वाढता प्रादुर्भाव आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे.

आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अंतर्गत नागरिकांना या परिसरात पर्यटनास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटकांना श्री क्षेत्र भीमाशंकर, कोढंवळ धबधबा आणि डिंबे धरण याठिकाणी पर्यटनासाठी जाता येणार नाही.

दरम्यान, नागरिकांनी या आदेश उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 आणि भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 188 नुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.