Pune : 50 हजाराची लाच स्वीकारल्याप्रकरणी एक लेखा परीक्षक ‘एसीबी’च्या जाळ्यात

एमपीसी न्यूज – ऑडिटमध्ये त्रुटी काढून त्यामध्ये संबंधितांवर कोणतीही कारवाई न करण्यासाठी सुमारे पन्नास हजाराची लाच स्वीकारल्याप्रकरणी एका लेखा परीक्षकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणेने रंगेहाथ पकडले. हि कारवाई एसीबीने शनिवारी (दि. 22) केली असून याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. यावेळी एसीबीने लाच स्वीकारलेली रक्कम जप्त केली आहे.

भगवंत नारायण बिडगर, (वय-56, पद – लेखा परीक्षक, श्रेणी -१,(वर्ग -३) जिल्हा विशेष लेखा परीक्षक, सहकारी संस्था, कार्यालय, पुणे.) असे अटक केलेल्या लोकसेवकाचे नाव आहे. याप्रकरणी 53 वर्षीय पुरुषाने तक्रार दिली होती.

याबाबत मिळालेली माहिती अशी, तक्रारदार हे प्रमाणित लेखा परीक्षक (खासगी) असून संस्थेच्या नेमणुकीनुसार त्यांनी त्या सहकारी पतसंस्थेचे ऑडीट केलेले होते. त्या ऑडिटमध्ये त्रुटी काढून त्यामध्ये तक्रादार यांच्यावर फौजदारी कारवाई न करण्यासाठी लेखा परीक्षक भगवंत बिडगर याने लाचेची मागणी करून यापूर्वीच ३ लाख रुपये स्वीकारले होते. उर्वरित ७५ हजाराच्या लाच मागणी पैकी ५० हजाराची मागणी करुन ती लाच रक्कम स्वीकारताना एसीबीने रंगेहाथ पकडण्यात आले. यावेळी एसीबीने लाच स्वीकारलेली रक्कम जप्त केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.