Pimpri : वृक्षारोपणासारखे उपक्रम सर्वांनी राबवले पाहिजेत – महापौर उषा ढोरे

एमपीसी न्यूज – वृक्षारोपणासारखे उपक्रम आपण सर्वांनी राबवले आणि आपले शहर फळा-फुलांनी बाहेरुन गेले तर पिंपरी चिंचवड शहराला कुठेही ऑक्सिजन कमी पडणार नाही, असे मत महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी आज (दि.२२) निगडी येथे व्यक्त केले.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वृक्षप्राधिकरण समितीतर्फे २५ वे फुले, बागा, भाजीपाला, फळे, वृक्षारोपण स्पर्धा व प्रदर्शन दि. २२ ते २४ फेब्रुवारी २०२० या कालावधीत नियोजित महापौर निवास स्थान प्राधिकरण, निगडी येथे आयोजित करण्यात आलेले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी मनोगत व्यक्त केले.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वृक्षप्राधिकरण समितीच्या वतीने कारखानदार, शासकीय व इतर संस्था, हॉटेल, लग्नकार्यालय, रोपवाटिका यांच्या तसेच खाजगी बंगला बाग, स्वच्छ सुंदर टेरेस गार्डन, मनपा शाळा, खाजगी शाळा, गृहरचना संस्था यांच्या नुकत्याच घेण्यात आलेल्या फुले, बागा, भाजीपाला, फळे, वृक्षारोपण स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम यावेळी पार पडला.

आज  (दि.२२) पासून चालू होणा-या या प्रदर्शनात वेगवेगळ्या जातीचे फुले, फळे ,भाजीपाला व वेगवेगळ्या वनौवषधी मांडण्यात आल्या आहेत. प्रदर्शन पाहण्यासाठी शहरातील लोक मोठ्याप्रमाणावर गर्दी करत आहेत.

शोभिवंत पाना फुलांच्या कुंड्या, फळे, भाजीपाला व पुष्प स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ सोमवार (दि.२४) सायंकाळी ५ वा. संपन्न होणार आहे. कार्यक्रमाचे मनोगत नगरसदस्य राजू मिसाळ यांनी केले तर प्रास्ताविक मुख्य उद्यान अधीक्षक सुरेश साळुंके यांनी केले आणि  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.