Pune : ज्योतिष हे क्रियाशील अध्यात्म – प्रतिभाताई शाहू मोडक

गुरुकुल विश्वपीठ ' आयोजित अखिल भारतीय ज्योतिषी संमेलनाचे उद्घाटन

एमपीसी न्यूज- ‘ज्योतिष हे क्रियाशील अध्यात्म आहे. ज्योतिष हे माणसाला हताश करण्यासाठी नाही, तर प्रेरणा देण्यासाठी आहे. असे मत ज्येष्ठ कवयित्री, ज्योतिष अभ्यासक प्रतिभाताई शाहू मोडक यांनी व्यक्त केले. ‘गुरुकुल विश्वपीठ’ आयोजित अखिल भारतीय ज्योतिषी संमेलनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. अजयचंद्र भागवत (गुरुजी ), राजकीय ज्योतिष अभ्यासक सिध्देश्वर मारटकर, विजय जकातदार, चंद्रकांत शेवाळे , डॉ.मधूसुदन घाणेकर, पल्लवी भागवत उपस्थित होते. सिद्धेश्वर मारटकर यांनी २०१९ च्या निवडणुकीवर ज्योतिष अंगाने प्रकाश टाकला.

मारटकर म्हणाले, ‘पाच राज्यातील निवडणुका सत्ताधारी पक्षाला जड जातील. राजस्थानात बदल होईल. छत्तीसगड, मध्य प्रदेश अटीतटीची लढत होईल. तेलंगणमध्ये काँग्रेस लढत देईल, पण तेलंगण राष्ट्र समिती सत्तेवर येईल. २०१९ च्या लोकसभा निवडणुकात सत्ताधारी पक्षाला संघर्ष करावा लागेल. कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळणार नाही. भाजपाला सत्ता स्थापनेची संधी अधिक असून इतर पक्षांची मदत घ्यावी लागेल. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका लोकसभेबरोबर घेतल्या तर युतीला लाभ मिळेल, मात्र, नंतर घेतल्यास जड जातील.

प्रतिभाताई मोडक म्हणाल्या, ‘ज्योतिष हे क्रियाशील अध्यात्म आहे. ज्योतिष हे माणसाला हताश करण्यासाठी नाही, तर प्रेरणा देण्यासाठी आहे. काळाच्या उदरात दडलेल्या गोष्टी शोधण्याचा प्रयत्न ज्योतिषी करतो. संकट कळाले तरी त्यातून सावरण्याची ताकद अध्यात्मातून मिळते”

नवीन तंत्रज्ञान आणि ज्योतिष , ‘थिंक लॉजिकली, अप्लाय अॅस्ट्रोलॉजीकली’, दैनंदिन जीवनातील अडचणी आणि ज्योतिष, हस्ताक्षर आणि ज्योतिष ,नक्षत्र आणि ज्योतिष ,नवे ग्रह आणि त्यांचा मानवी जीवनावरील प्रभाव अशा अनेक विषयांवर व्याख्यान सत्रे आयोजित करण्यात आली होती.

ज्योतिष क्षेत्रातील व. दा. भट, नंदकिशोर जकातदार, डॉ. मधूसूदन घाणेकर, विजय जकातदार, सुनील मावळे, आरती घाटपांडे , डॉ . श्रीहृदय भागवत, रजनी साबदे इत्यादी मान्यवरानी विविध व्याख्यान सत्रात मार्गदर्शन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.