Pune : भारतीय विद्या भवन -इन्फोसिस फाऊंडेशन तर्फे शुक्रवारी ‘ नृत्य संध्या ‘

एमपीसी न्यूज- भारतीय विद्या भवन -इन्फोसिस फाऊंडेशनतर्फे सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत ‘ नृत्य संध्या ‘ या ओडिसी नृत्य कार्यक्रमाचे शिउक्रवारी (दि. १४) आयोजन करण्यात आले आहे .सरदार नातू सभागृह ,भारतीय विद्या भवन येथे सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम होईल, अशी माहिती भारतीय विद्या भवनचे मानद सचिव नंदकुमार काकिर्डे यांनी पत्रकाद्वारे दिली.

आकांक्षा ओडिसी नृत्यालयच्या संस्थापक रसिका गुमास्ते, त्यांच्या शिष्या आणि शुभदा वारदेकर यांच्या शिष्या शमा अधिकारी या कार्यक्रम सादर करणार आहेत. हा कार्यक्रम विनामूल्य असून सर्वांसाठी खुला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.