Pune : वाढत्या लोकसंख्याप्रमाणे पुणेकरांना 17.50 टीएमसी पाणी मिळावे -महापालिका सर्वसाधारण सभेत चर्चा

एमपीसी न्यूज – वाढत्या लोकसंख्या प्रमाणात पुणेकरांना सुमारे 11.50 टीएमसी पाणी कमी पडत आहे. त्यामुळे 17. 50 टीएमसी पाणी मिळावे, अशी चर्चा महापालिका सर्वसाधारण सभेत आज करण्यात आली. पुणे महापालिका आणि जलसंपदा विभाग यांच्यात 11.50 टीएमसी पाणी करार करण्यास, भविष्यात पाणी वापराबाबत वाढीव कोट्याप्रमाणे करारनामा करण्याचे अधिकार आयुक्तांना करण्यास, शासन निर्णयानुसार वेळोवेळी ठरविण्यात आलेल्या दरानुसार पाणी वापराची देयके जलसंपदा विभागाकडे करण्यास मान्यता देण्यात आली.

जलसंपदा आणि पुणे महापालिका यांच्यात 11.50 टीएमसी पाणी वाटपाचा करार संपुष्टात आला आहे. तो नूतनीकरण करणे गरजेचे आहे. राष्ट्रपती राजवटीमुळे हा करार रखडला होता. कालवा समितीची बैठक झाली नाही. नवीन कॅबिनेटमध्ये पाणी वापराचा करार करण्यात येणार असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. तर, कालव्याला प्रॉपर्टी टॅक्स का लावला नाही? महापालिकेचे हित का बघितले नाही? त्यांना 2 टक्के व्याज लावणार का? असे अनेक सवाल काँगेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी उपस्थित केले.

जलसंपदा विभाग मनमानी कारभार करतात. आपल्या मोटारी जप्त करतात. आमची सत्ता आल्यावर तातडीने वाढीव पाणीसाठा मंजूर करणार असल्याचे विरोधी पक्षनेते दिलीप बराटे म्हणाले. दरम्यान, जलसंपदा विभागाची महापालिकेकडे 450 कोटी रुपये थकबाकी होती. ती 150 कोटींवर आणल्याचे कुलकर्णी यांनी निक्षून सांगितले. या रकमेत काशी तडजोड केली?, अशी विचारणा राष्ट्रवादीचे नगरसेवक विशाल तांबे यांनी केली. त्यावर प्रशासनाला उत्तर देता आले नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.