Pune : जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी 7 जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज -जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी 7 जणांवर खडक पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी सिद्धिविनायक राजेंद्र हिंगे यांनी फिर्याद दिली आहे . श्रीनाथ अशोक शेलार(वय 22, रा.घोरपडे पेठ), कुणाल सुरेश जाधव(वय 22, रा. घोरपडे पेठ),  विपुल बबनराव इंगवले(वय 25, रा.घोरपडे पेठ),  प्रमोद साखराम शेलार(रा.घोरपडे पेठ), राहुल शाम भरगुडे(वय 22, रा.शुक्रवार पेठ), अक्षय संजय जाधव(वय 23, रा.घोरपडे पेठ), अनिकेत पांडुरंग नावगिरे(वय 22, रा.घोरपडे पेठ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सिद्धिविनायक हिंगे हे त्यांच्या दुचाकीवर जात होते दरम्यान श्रीनाथ शेलार आणि त्याचे इतर 6 साथीदार दुचाकीवर आले आणि त्यांनी हिंगे यांच्या दुचाकी समोर त्यांच्या गाड्या लावून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला.याप्रकरणी श्रीनाथ शेलार आणि त्याच्या टोळीविरुद्ध खडक पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.