Pune : भारतीय विद्या भवन, इन्फोसिस फाऊंडेशनतर्फे मंगळवारी ‘कृष्णमिती’ कार्यक्रम

एमपीसी न्यूज – भारतीय विद्या भवन, इन्फोसिस फाऊंडेशनतर्फे सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत श्रीकृष्णाच्या जीवनाचे पैलू  दाखविणाऱ्या ‘कृष्णमिती’ या भरतनाट्यम नृत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

‘कलावर्धिनी’ नृत्यसंकुल प्रस्तुत हा कार्यक्रम मंगळवार, १० मार्च रोजी सायंकाळी साडेसहा वाजता भारतीय विद्या भवनच्या सरदार नातू सभागृहामध्ये होणार आहे, अशी माहिती भारतीय विद्या भवनचे सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

 

नृत्यगुरू डॉ. सुचेता चापेकर, अरुंधती पटवर्धन, सागरिका पटवर्धन, प्राजक्ता  पावणसकर, ऋचा खरे हा कार्यक्रम प्रस्तुत करणार आहेत. सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमाअंतर्गत सादर होणारा हा 103 वा कार्यक्रम आहे. हा सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.