Pune News : नाताळ साजरा करण्यासाठी जात असताना बाईकचा अपघात; 22 वर्षीय तरुणीचा मृत्यू

एमपीसी न्यूज : नाताळ साजरा करण्यासाठी मित्रासोबत दुचाकी वर जात असताना झालेल्या भीषण अपघातात 22 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. (Pune News) वानवडी परिसरातील भैरोबा नाला येथे रविवारी मध्यरात्री हा अपघात झाला. या अपघातानंतर तरुणीच्या मित्राला जबाबदार धरण्यात आले असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

व्यंकटप्रसन्न श्रीनिवास विपुरी (वय 22) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी तिचा दुचाकी स्वार मित्र विल्सन मारीस पिल्ले (वय 22) याच्या विरोधात वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत तरुणीच्या बहिणीने याप्रकरणी तक्रार दिली आहे.

MPC News Podcast 27 December 2022 : ऐका…आजचे एमपीसी न्यूज पॅाडकास्ट

अधिक माहिती अशी की, व्यंकट प्रसन्नपुण्यातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होती. रविवारी ते नाताळ साजरा करण्यासाठी घराबाहेर पडले होते. (Pune News) मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास विल्सन याचे दुचाकी वरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी स्लिप झाली. यामध्ये व्यंकट प्रसन्नाच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.