Pune : सामाजिक कार्यकर्त्याच्या प्रयत्नाने 96 गरीब रुग्णांचे वैद्यकीय बिल माफ

एमपीसी न्यूज – पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत काकासाहेब मोरे यांनी कोरोनाच्या संकट काळात 96 गरीब रुग्णांचे 19 लाख 67 हजार बिल माफ करण्यासाठी प्रयत्न केले. केंद्र, राज्य सरकार, धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या व पुणे महापालिकेच्या आरोग्य सुविधेची माहीती देऊन या सर्व रुग्णांचे वैद्यकीय बिल माफ करून मोफत उपचार मिळवून दिले.

सामाजिक कार्यकर्ते मोरे यांच्या या सेवाभावी कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. ज्या रुग्णांचे वार्षिक उत्पन्न 85 हजारांच्या आत आहे. त्याबाबतचे पुरावे देऊन बिल माफ करून घेतले. तस्सेच ज्यांचे उत्पन्न 85 हजार ते 1 लाख 60 हजारापर्यंत आहे त्यांचेही अर्धे बिल माफ झाले.

या सर्व रूग्णांना त्यांनी रुग्णवाहिकेतून हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट केले. तिथे रूग्णांवर उपचार पूर्ण झालेले 77 रुग्ण पुन्हा रुग्णवाहिकेतून घरी नेऊन सोडण्याचे कामही मोरे यांनी केले.

औषधांसह सर्व रुग्णांना एक महीना पुरेल इतका किरणाही त्यांनी मिळवून दिला. मोरे यांनी गेले दहा वर्ष पोलीस दलास मदत म्हणून रस्ते अपघातातील 442 मृतदेह उचलण्यासाठी मोलाची मदत केली आहे. त्याचबरोबर अपघातातील जखमींना वेळीच रुग्णांलयात दाखल करून 33 जणांचे प्राण वाचवले आहेत.

केंद्र सरकार, राज्य सरकार व धर्मादाय आयुक्त कार्यालय, पुणे महानगरपालिका यांच्या विविध आरोग्य सेवा व सुविधा यांची माहिती देण्याचे काम ते सातत्याने करीत आहेत.

त्यामुळे गरीब व सर्व सामान्य कुंटुबांतील रुग्णांना मोरे यांचा मोठा आधार आहे. त्यांनी 10 वर्षात 2 हजार 567 रुग्णांना मोफत उपचार मिळवून देण्याचे सामाजिक कार्य केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.