Pune Breaking : शिक्षणाच्या माहेर घरात 1 कोटी रुपयांचे अफीम जप्त; राजस्थानची टोळी अटकेत

एमपीसी न्यूज : शिक्षणाच्या माहेर घरात तब्बल 1 कोटी रुपयाचे  (Pune Breaking) अफीम जप्त करण्यात आळे असून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथक एकने 3  जणांना अटक केली आहे. राजस्थानची टोळी अफीमचा साठा गोळा करत असल्याचे या कारवाईतून समोर आले आहे. 

या प्रकरणी सुमेर जयरामजी बिष्णोई, चावंडसिंग मानसिंग राजपूत, लोकेंद्रसिंह महेंद्रसिंग राजपूत असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पुण्यातील गोकुळनगर भागात पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी कात्रज भागात पेट्रोलींग करत असताना माहिती मिळाली की, कात्रज-कोंढवा रोडवर एक व्यक्ती अफिम या अंमली पदार्थाची विक्री करत आहेत. पोलिसांनी छापा टाकून सुमेर बिष्णोई याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 64 लाख 28 हजार रुपये किमतीचे 3 किलो 214 ग्रॅम अफीम जप्त केले.

Maharashtra : गिरणी कामगार घरांसाठीच्या अर्जांची छाननी तीन महिन्यात पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

अधिक चौकशी केली असता त्याने अफिम हे त्याचे दोन साथीदार (Pune Breaking) चावंडसिंग राजपूत व लोकेंद्रसिंह राजपूत यांच्याकडून आणल्याचे सांगितले. तसेच त्यांनी अंमली पदार्थाचा साठा करुन ठेवल्याचे सांगितले. त्यानुसार आरोपींकडून 1 कोटी रुपयाचे अमली पदार्थ जप्त केले आहे.

नेमके हे अमली पदार्थ कुठे विकले जाणार होते याचा तपास पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.