Yamunanagar : यमुनानगरमध्ये गाय आणि वासराला लंपीची लागण; दोन दिवसात इतर गायींचे तात्काळ होणार लसीकरण

एमपीसी न्यूज : यमुनानगर येथे लंपीची साथ (Yamunanagar) पसरल्याचे समोर आले आहे, अशी माहिती सचिन चिखले यांनी दिली. आज दुपारी सचिन चिखले यांना यमुनानगर येथे स्कीम नंबर 10, सुवर्णयोग मित्र मंडळ येथून फोन आला. यावेळी घटनास्थळी चिखले यांनी तात्काळ धाव घेतली. यावेळी एक गाय आणि तीचे वासरू तडफडत असल्याचे निदर्शनास आले. 

गाय आणि तीचे वासरू यांना लंपी आजार झाल्याचे समोर आले आहे. परंतु, काही वेळातच गायीचा मृत्यू झाला. यावेळी तात्काळ चिखले यांनी पशुवैद्यकीय अधिकारी दगडे यांना फोन करून त्यांची सर्व पशुवैद्यकीय विभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली.

Pune Breaking : शिक्षणाच्या माहेर घरात 1 कोटी रुपयांचे अफीम जप्त; राजस्थानची टोळी अटकेत

मयत गाईला गाडीमध्ये ठेवण्यात आले. यावेळी बाजूला (Yamunanagar) असणाऱ्या 2 गायींचे लसीकरण करण्यात आले. तर पुढील दोन ते तीन दिवसात प्रभागातील सर्व गाई आणि वासरे यांचे लवकरात लवकर लसीकरण करून घेण्यात यावे अशी माहिती दगडे साहेब व त्यांची आरोग्य विभागाची टीमला देण्यात आली आहे.

यावेळी सचिन चिखले यांच्यासोबत प्रसाद कोलते, बाबा परब, प्रमोद बोबे, रोहित काळभोर, आरोग्य विभागाचे मांढरे,
सोमनाथ काळभोर, ओमकार पवार  व त्यांच्या मित्रपरिवाराने मदत केली. पुढे सर्व गाई वासरांचे लंपी आजाराचे लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती चिखले यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.