Pune Bye-Election : आजपासून पुण्यात प्रचाराचा उडणार धुराळा; मोठे नेते प्रचारासाठी सज्ज

एमपीसी न्यूज : आज पुण्यात निवडणुकीचा धुराळा (Pune Bye-Election) उडणार आहे. उमेदवारांच्या प्रचारसाठी मोठे नेते पुण्यात उपस्थित राहणार आहेत. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री सुधीर मुनगंटीवार, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार हजर असणार आहेत. 

भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचाराची सुरुवात मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील तर चिंचवडचे राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रसारासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार हजर राहणार आहेत.

Shapit Gandharva : भाग 25 – बलदंड महेश आनंद

कॉंग्रेसचे आमदार संग्राम थोपटे, राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे, आमदार आदित्य ठाकरे हे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत. पुण्यात आता प्रचाराचे वातावरण (Pune Bye-Election) सुरू झाले असून कोण बाजी मारणार हे औत्स्युकाचे ठरले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.