Pune : सिमेंटचा मिक्सर रस्ता दुभाजकाला धडकून उलटला

एमपीसी न्यूज – मेट्रोच्या कामासाठी निघालेला सिमेंटचा मिक्सर चालकाचा ताबा सुटल्याने रस्ता दुभाजकाला धडकून उलटला. ही घटना आज पहाटे 5 च्या सुमारास वाडिया कॉलेज ते जहांगीर हॉस्पिटलच्या रस्त्यावर घडली.

_MPC_DIR_MPU_II

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आज पहाटे वाडिया कॉलेजकडून जहांगीर हॉस्पिटलच्या दिशेने निघालेला सिमेंट मिक्सर चालकाचा ताबा सुटल्याने रस्ता दुभाजकाला धडकून उलटला. अपघातग्रस्त मिक्सर रस्त्यामध्ये आडवा झाल्यामुळे वाडिया कॉलेज ते जहांगीर हॉस्पिटल हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला.

मेट्रोच्या कामाकरिता हा मिक्सर पिंपरीच्या दिशेने निघाला होता. अपघातानंतर चालक आणि त्याचा एक साथीदार पळून गेले असून, मिक्सर हटविण्यासाठी मोठ्या क्रेन मागविण्यात आल्या आहेत. चालकाचे वय कमी असल्याचीही माहिती पुढे आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.