Pune : ‘चिंटू ‘ आणि वाडा संस्कृतीतील खेळ !

'चिंटू ' समवेत ढेपेवाडा येथे 24 नोव्हेंबर रोजी आयोजन

एमपीसी न्यूज- पुण्याच्या जुन्या वाडा संस्कृतीचे प्रतीक असलेल्या ‘ढेपेवाडा ‘ तर्फे 24 नोव्हेंबरला (शनिवारी ) ‘चिंटू ‘ आणि वाडा संस्कृतीतील खेळ ! ‘ या उपक्रमाचे आणि एक दिवसीय सहलीचे आयोजन करण्यात आले आहे.

‘चिंटू’ चे निर्माते चित्रकार चारुहास पंडित हे या सहलीतील सहभागी मुलामुलींना, पालकांना ‘चिंटू ” ची रेखाटने करून दाखवणार आहेत . ‘ढेपेवाडा ‘ चे संचालक नितीन ढेपे आणि ऋचा ढेपे या पुण्याच्या वाडा संस्कृतीतील पारंपरिक खेळ शिकवणार आहेत, वाडासंस्कृतीतील रहाणीमानाची ओळख करून देणार आहेत .

सकाळी ९ ते सायं ४ वाजेपर्यंत या सहलीत ७ ते १४ वर्षे वयोगटातील मुलामुलींना एक वेगळा अनुभव घेण्यासाठी पालकांसह सहलीत अंतर्गत सहभागी होता येईल . अधिक माहितीसाठी संपर्क 9822640599, 9763276232 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.