Pune : विद्यापीठ रस्त्यावर उड्डाणपुलाच्या कठड्याला पेट्रोलचा टँकर धडकला; वाहतूक विस्कळीत

एमपीसी न्यूज- अचानक डुलकी लागल्याने चालकाचा ताबा सुटून एक पेट्रोल वाहून नेणारा टँकर (एम एच 43 बीपी 423) उड्डाणपुलाच्या दुभाजकाला धडकला. हा अपघात आज पहाटे पाच वाजता विद्यापीठ रस्त्यावर ई स्क्वेअर जवळील उड्डाणपुलावर घडला. या अपघातामुळे उड्डाणपुलावरील तसेच खालच्या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. सकाळची कार्यालयीन कामाला जाण्याची वेळ असल्यामुळे नोकरदारांचे हाल झाले. टँकर बाजूला घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत परंतु अद्याप यश आले नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.