Pune : ‘अपघात मुक्त भारत’ संकल्पनेसाठी पुस्तिका, लघुपट आणि घोषवाक्यांचे लोकार्पण

एमपीसी न्यूज- रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी , ‘अपघात मुक्त भारत’ ही संकल्पना घेऊन पुणे पोलीस वाहतूक शाखा आणि ढेपेवाडा परिवाराच्या संयुक्त विद्यमाने वाहतुकीच्या सुरक्षा नियमांची माहिती पुस्तिका, शॉर्ट फिल्म आणि घोषवाक्यांचे फलक तयार करण्यात आले आहेत.

वाहतूक शाखेचे उपायुक्त प्रसाद अक्कावणुरू यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक राजेश पुराणीक,पोलीस निरीक्षक मशाळकर, पोलीस निरीक्षक नलावडे ,पोलीस निरीक्षक खांडेकर, पोलीस उपनिरीक्षक लोहोकरे , हवालदार भोगन तसेच ऋचा ढेपे, अंकुश राजे, ज्योतिबा इंगळे, सुरज बांडागळे उपस्थित होते.

नितीन ढेपे यांनी रस्ता सुरक्षा अभियानसाठी विविध साधनांची निर्मिती केली असून त्यासाठी त्यांनी वाहतुकीच्या सुरक्षा नियमांची माहिती पुस्तिका लिहिली आहे. तसेच वाहतूक सुरक्षा घोषवाक्यांचे फलक आणि एक शॉर्टफिल्म तयार केली आहे.

ढेपे ह्यांनी वाहतूक नियमावली आणि घ्यायच्या काळजी बद्दल सर्वसामान्य माणसाला कळेल अशा सोप्या शब्दांत मराठी व इंग्रजी भाषेत माहिती पुस्तिका लिहिली आहे. तसेच सुरक्षित वाहतुकीसाठी 25 वेगवेगळी घोषवाक्ये (स्लोगन) लिहिली असून त्याचे संदेश फलक तयार करण्यात आले आहेत. ते पोलीस समुपदेशन केंद्रात आणि रस्त्यांवर लावण्यात येणार आहेत. बेशिस्त वाहनचालकावर 6 मिनिटांच्या शॉर्ट फिल्मचे लिखाण व निर्मिती देखील नितीन ढेपे यांनी केली आहे.

वाढत्या अपघातांपासून आपले व आपल्या आप्तांचे संरक्षण करणे आपल्याच हातात आहे त्यामुळे सर्वसामान्य माणसांनीच पुढाकार घेऊन ‘अपघात मुक्त भारत’ घडवावा अशी हे सर्व करण्या मागची संकल्पना आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.