Pune : मोदींच्या नेतृत्वावर देशवासियांचा अढळ विश्वास : मुरलीधर मोहोळ

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर (Pune)देशवासियांचा अढळ विश्वास आहे, यावर या निकालाने पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. मोदींवर कॅांग्रेसने अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली.

ही टीका देशवासियांना रुचली नाही, हे या निकालाने सिद्ध झाले आहे, असे पुणे लोकसभा निवडणूक प्रमुख भाजपा मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

Pimpri : पिंपरी चिंचवड भाजपाच्या वतीने तीन राज्यातील निवडणुकींचा विजयोत्सव साजरा

मोदींच्या गरीब कल्याणाच्या आणि विकासाच्या (Pune)अजेंड्यापुढे कॅांग्रेसचा खोट्या आश्वासनांचा अजेंडा निष्प्रभ ठरला आहे. या यशाबद्दल भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक घटकाचे मनापासून अभिनंदन. देशातील मतदारांचा हा ट्रेंड पुणे लोकसभेतही कायम असेल. आम्ही सर्व कार्यकर्ते लोकसभेच्या निवडणुकीसाठी उत्सुक आणि सज्ज आहोत’, असेही मोहोळ म्हणाले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.