Pune News : पुणे शहर काँग्रेसचे कार्यालय सचिव उत्तम भूमकर यांचे निधन

एमपीसी न्यूज – पुणे शहर काँग्रेस पक्षाचे कार्यालयीन सचिव उत्तम भूमकर (वय 80 ) यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने आज (रविवारी) दुपारी काँग्रेस भवनाच्या आवारात निधन झाले.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त काँग्रेस भवनात माजी मुख्य मंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार, वृक्षारोपण असा कार्यक्रम आयोजित केला होता. या वृक्षारोपण कार्यक्रमाच्या तयारीची पहाणी मैदानात करीत असताना भूमकर अचानक कोसळले.

त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. तत्पूर्वी त्यांचे प्राणोत्क्रमण झाले होते. भूमकर यांच्या निधनाची वार्ता कळताच काँग्रेस भवनात श्रध्दांजली वाहून कार्यक्रम रद्द करण्यात आले. या कार्यक्रमासाठी पृथ्वीराज चव्हाण, ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस काँग्रेस भवनात उपस्थित होते.

गेली तीस वर्ष काँग्रेस भवनात कार्यालयीन सचिव म्हणून भूमकर काम पहात होते. पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे ते माजी सदस्य होते. काँग्रेस ज्येष्ठ नागरिक संघाचे ते विद्यमान कार्याध्यक्ष होते.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.