Pune : कंटेनर चालकाने ऑफिसमधून पळविले 83 हजार

एमपीसी न्यूज – ट्रान्सपोर्टमधील एका (Pune) कंटेनरवर चालक म्हणून काम करणाऱ्या कामगाराने ऑफिसमधून 83 हजार 550 रुपये रोख रक्कम चोरून नेली. ही घटना 1 मे रोजी दुपारी साडेतीन ते चार वाजताच्या कालावधीत नवलाख उंबरे येथे घडली.

बब्बू विश्वकर्मा (मूळ रा. नवलाख उंबरे, ता. मावळ) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी गोरख जयवंत पडवळ (वय 39, रा. नवलाख उंबरे, ता. मावळ) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पडवळ यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. त्यांच्या ट्रान्सपोर्टमध्ये आरोपी विश्वकर्मा हा एका कंटेनरवर चालक म्हणून काम करतो.

Wakad : अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास अटक

विश्वकर्मा याने फिर्यादी (Pune) यांच्या ऑफिसमधील टेबलच्या ड्रॉवरमधून 83 हजार 550 रुपये रोख रक्कम चोरून नेली. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.