Pimple Gurav : कारच्या धडकेत पादचारी तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज : रस्ता ओलांडत असलेल्या तरुणाला एका कारने धडक दिली. (Pimple Gurav) यामध्ये गंभीर जखमी झालेल्या मुलाचा मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी (दि. 4) सकाळी पावडेनऊ वाजताच्या सुमारास पिंपळे गुरव येथे घडला.

संतोष बजरंग तांबे (वय 33, रा. आंबेगाव, जि. पुणे) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. त्यानुसार चेतन बाळू महिंद्रकर (वय 27, रा. चाकण) याला पोलिसांनी अटक केली आहे.

Pune : कंटेनर चालकाने ऑफिसमधून पळविले 83 हजार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा सतरा वर्षीय पुतण्या आणि त्याचा मित्र असे पिंपळे गुरव येथील गारवे लॉन्सच्या समोर असलेल्या बीआरटी मार्गावरील रस्ता ओलांडत होते. (Pimple Gurav) त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या एका कारने फिर्यादी यांच्या पुतण्याला जोरात धडक दिली. त्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या पुतण्याचा मृत्यू झाला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.