Wakad : अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास अटक

एमपीसी न्यूज – घरात जाऊन अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन (Wakad) करत तिचा विनयभंग केला. या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. ही घटना बुधवारी (दि. 3) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास काळा खडक वाकड येथे घडली.

अक्षय प्रकाश लोंढे (वय 35, रा. काळाखडक वाकड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Talegaon Dabhade : टपरी धारकांची पिळवणूक पोलिसांनी थांबवावी –  सुनील मोरे

पोलिसांनी (Wakad) दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची बारा वर्षीय मुलगी घरी एकटी असताना आरोपी फिर्यादी यांच्या घरात गेला. फिर्यादी यांच्या मुलीला शिवीगाळ करून तिच्याशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.