Talegaon Dabhade : टपरी धारकांची पिळवणूक पोलिसांनी थांबवावी –  सुनील मोरे

एमपीसी न्यूज : तळेगाव शहरातील (Talegaon Dabhade) छोट्या व्यवसायिकांची, ज्यूस विक्रेते, चाट सेंटर, चायनीज, तसेच इतर फास्ट फूड धारकांची पिळवणूक पोलिसांनी थांबवावी अशी विनंती  करणारा अर्ज शिवसेना मावळ तालुका संघटक सुनील उर्फ मुन्ना मोरे  यांनी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथे केला आहे.

अर्जात मोरे यांनी म्हटले आहे की, पोलीस पेट्रोलिंग करत असताना रात्री 10 वाजल्या नंतर छोट्या टपरी धारकांना व व्यवसायिकांना आपला व्यवसाय बंद करण्यासाठी जबरदस्ती केल्यामुळे सर्व व्यावसायिक नाराज झाले व सर्वांनी रात्री उशिरा अकरा वाजता पोलीस स्टेशन येथे पोलिसांच्या वागणुकीबाबत नाराजी व्यक्त करत लेखी तक्रार दिली.

तळेगाव शहरामध्ये सध्या भोंगळ कारभार सुरू असून पोलीस प्रशासनाच्या मर्जीतील हॉटेल्स, बार, तसेच टपरीधारक, हे रात्री उशिरा अकरा नंतर देखील सर्रासपणे व्यवसाय करत असतात त्यांना कुठलाही नियम अटी व वेळेचे बंधन लागू नसल्यामुळे इतर व्यवसाय करणाऱ्या गोरगरीब व्यापारी व टपरी धारकांवर अन्याय होत असल्याचे सुनील मोरे यांनी यावेळी नमूद केले आहे.

Shirgaon : गहुंजे येथे सुरक्षा रक्षकाला जातीवाचक शिवीगाळ

अर्जात म्हटले आहे की, सरसकट सर्वांना एकच नियम तळेगाव पोलीस स्टेशन यांनी  लावावा त्यामुळे रात्री उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या सर्व टपऱ्या हॉटेल्स व बार यांना उशिरापर्यंत व्यवसाय करण्यासाठी आळा बसेल तसेच गुन्हेगारीचे प्रमाण देखील आटोक्यात येईल असे  सुनील मोरे यांनी यावेळेस स्पष्ट केले आहे.(Talegaon Dabhade) काही राजकीय व्यक्तींच्या वरदहस्ताने तसेच पोलीस प्रशासनाच्या वरदहस्ताने रात्री उशिरापर्यंत हॉटेल्स व टपरी सुरू असल्यामुळे तळेगावातील छोट्या टपरीधारकांवर अन्याय होत आहे त्यामुळे एकाला एक नियम व दुसऱ्याला दुसरा नियम असे न करता सरसकट सर्वांना एकच नियम लावावा अशी मागणी मोरे यांनी केली आहे.

 

टपरी धारकांकडून आर्थिक देवाण घेवाण होत असल्याचा संशय देखील सुनील मोरे यांनी व्यक्त केला आहे, त्यामुळे काही मर्जीतील व्यवसायिकांना रात्री उशिरापर्यंत व्यवसाय करण्याची मुभा प्रशासनामार्फत देण्यात येत आहे का? असा देखील सवाल  यावेळी विचारला आहे. (Talegaon Dabhade) तरी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवदवाड साहेब यांनी सदर प्रकरणी लक्ष घालून तळेगाव मध्ये वेळेचे बंधन घालून शिस्त लावावी, पोलिसांच्या मर्जीतील हॉटेल्स, बार, व धारकांवर कारवाई करण्याचे धाडस दाखवावे अशी विनंती शिवसेना तालुका संघटक सुनील उर्फ मुन्ना मोरे  यांनी केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.