Shirgaon : गहुंजे येथे सुरक्षा रक्षकाला जातीवाचक शिवीगाळ

एमपीसी न्यूज :  एका व्यक्तीने सुरक्षा रक्षकाला (Shirgaon) जातीवाचक शिवीगाळ करून दमदाटी केली. या प्रकरणी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. 3) दुपारी एक वाजताच्या सुमारास गहुंजे येथील लोढा बेलमोंडो सोसायटीमध्ये घडली.

पवन गोयल असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी 31 वर्षीय सुरक्षा रक्षकाने शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Bhosari : तडीपार गुंडाला शस्त्र बाळगल्या प्रकरणी अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोढा बेलमोंडो या सोसायटीमध्ये टॉवर क्रमांक 24 व 25 मध्ये पाडलेल्या भिंतीचे काम चालू होते. तिथे आरोपी आले. त्यांनी फिर्यादी यांना भिंत कोणाच्या परवानगीने बांधत आहेस, अशी विचारणा केली. त्यावर ‘कंपनीच्या सांगण्यावरून भिंतीचे काम सुरू असल्याचे फिर्यादी यांनी सांगितले. (Shirgaon) त्यानंतर आरोपीने फिर्यादी यांना जातीवाचक शिवीगाळ करून दमदाटी केली. तसेच बांधलेल्या भिंतीला लाथ मारून भिंत पाडली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त पद्माकर घनवट तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.