IT Raids : बांधकाम व्यावसायिकांवर छापे

एमपीसी न्यूज –  आयकर विभागाने पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील बांधकाम व्यावसायिकांवर छापे घातल्याची माहिती आहे. (IT Raids) पिंपरी कॅम्प, पिंपळेसौदागर, पाषाण रस्त्यावरील सिंध सोसायटीत गुरुवारी छापे घातल्याचे सांगितले जात आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवडमधील तीन बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाने छापे घातल्याचे सांगितले जाते.  पिंपरी कॅम्प, पिंपळेसौदागर, पाषाण रस्त्यावरील सिंध सोसायटीत छापे घातल्याचे सांगितले जाते. गुरुवारी सकाळीच प्राप्ती कर विभागाच्या अधिकाऱ्यांनी बांधकाम व्यावसायिकांचे कार्यालय आणि निवासस्थानी जाऊन कारवाई केल्याचे समजते.

Wakad : अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास अटक

या कारवाईत काही कागदपत्रे जप्त करण्यात आल्याचे सांगितले जाते.(IT Raids) नेमकी कोणत्या बांधकाम व्यावसायिकांवर छापे घातले आहेत, याची माहिती समोर आली नाही.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.