Pune : ‘करोना’बाधित रुग्णांनी डॉ. नायडू हॉस्पिटल’ झाले फुल्ल; नवीन रुग्णांची तपासणी होणार बोपोडीतील रुग्णालयात

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या डॉ. नायडू हॉस्पिटलमध्ये दिवसेंदिवस वाढत असलेले कोरोनाचे रुग्ण घेण्याची क्षमता आता संपली आहे. हे रुग्णालय फुल्ल भरल्याने यापुढे नवीन रुग्णांची महापालिकेच्या बोपोडी येथील खेडेकर हॉस्पिटल येथे तपासणी होणार आहे.

नायडू हॉस्पिटलमधील कोरोनासाठी स्थापित केलेले १०० बेड पूर्ण भरले आहेत. नायडू हॉस्पिटलमध्ये कोरोनाचे ३९ पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. तर, संशयित म्हणून दाखल रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. यापैकी ६९ जणांचे तपासणी अहवाल येणे बाकी आहे. कोरोना पॉझिटिव्ह म्हणून उपचार घेणाऱ्या आणि चौदा दिवसांनंतर ज्यांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले त्या १५ जणांना घरी सोडण्यात आले.

नायडू हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढतीच आहे. कोरोनाची लक्षणे असलेल्यांना उपचारासाठी दाखल करून घेतले जात आहे. कोरोनाच्या रुग्णांची आता 100 री पार झाली आहे. त्यामुळे पुणेकरांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.