Pune Corona Update : दिवसभरात नवे 159 कोरोनाबाधित; 130 रुग्णांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पुणे शहरात आज (मंगळवारी) नव्याने 159 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 130 रुग्णांना डिस्चार्ज दिल्याची नोंद करण्यात आली आहे. 

शहरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 4 लाख 99 हजार 618 इतकी तर एकूण डिस्चार्ज संख्या 4 लाख 89 हजार 014 झाली आहे. पुणे शहरात उपचार घेणाऱ्या 1 हजार 596 रुग्णांपैकी 180 रुग्ण गंभीर तर 268 रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत..

पुणे महापालिका हद्दीत नव्याने 04 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 9 हजार 008 इतकी झाली आहे. शहरात आज एकाच दिवसात 06 हजार 187 नमुने घेण्यात आले आहेत.  पुण्यातील एकूण ॲक्टिव्ह रुग्णसंख्या 1596 इतकी झाली आहे.

नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. तोंडाला मास्क, हात धुणे आणि शारीरिक आंतरपालन करण्याचे आवाहन पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.