Pune Corona Update :1680 रुग्ण कोरोनामुक्त, 1773 नवे रुग्ण, 38 जणांचा मृत्यू

सध्या कोरोनाचे पुणे शहरात 89 हजार 90 रुग्ण झाले आहेत. 71 हजार 949 रुग्णांनी वेळीच उपचार घेतल्याने कोरोनावर मात केली आहे.

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाचे संकट आटोक्यात येत असून, गुरुवारी तब्बल 1680 रुग्ण या आजारातून मुक्त झाले. 6 हजार 92 कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 1773 नवे रुग्ण आढळले. 38 जणांचा मृत्यू झाला. 818 क्रिटिकल रुग्ण असून, त्यात 496जण व्हेंटिलेटरवर आहेत.

सध्या कोरोनाचे पुणे शहरात 89 हजार 90 रुग्ण झाले आहेत. 71 हजार 949 रुग्णांनी वेळीच उपचार घेतल्याने कोरोनावर मात केली आहे.

आतापर्यंत या रोगामुळे 2 हजार 146 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 14 हजार 995 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.

फुरसुंगीतील 55 वर्षीय पुरुषाचा, हडपसरमधील 64 वर्षीय पुरुषाचा नोबेल हॉस्पिटलमध्ये, कर्वेनगरमधील 78 वर्षीय पुरुषाचा कमांड हॉस्पिटलमध्ये, बाणेरमधील 61 वर्षीय पुरुषाचा AIMS हॉस्पिटलमध्ये, गुरुवार पेठेतील 71 वर्षीय पुरुषाचा, येरवड्यातील 56 वर्षीय पुरुषाचा, कोंढव्यातील 50 वर्षीय महिलेचा, बिबवेवाडीतील 41 वर्षीय पुरुषाचा, नाना पेठेतील 51 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

चंदननगरमधील 59 वर्षीय पुरुषाचा, रविवार पेठेतील 64 वर्षीय पुरुषाचा कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये, ससाणेनगरमधील 75 वर्षीय महिलेचा, हडपसरमधील 65 वर्षीय पुरुषाचा मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये, सहकार नगरमधील 56 वर्षीय पुरुषाचा दळवी हॉस्पिटलमध्ये, गणेश पेठेतील 73 वर्षीय पुरुषाचा सिम्बॉयसिस हॉस्पिटलमध्ये, शनिवार पेठेतील 72 वर्षीय पुरुषाचा, विश्रांतीवाडीतील 57 वर्षीय पुरुषाचा बुधराणी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

कोंढवा बुद्रुकमधील 60 वर्षीय महिलेचा, आंबेगावमधील 75 वर्षीय महिलेचा ग्लोबल हॉस्पिटलमध्ये, आंबेगावमधील 35 वर्षीय पुरुषाचा, उत्तमनगरमधील 74 वर्षीय पुरुषाचा काशीबाई नवले हॉस्पिटलमध्ये, महर्षीनगरमधील 70 वर्षीय महिलेचा, कोंढव्यातील 75 वर्षीय पुरुषाचा, 61 वर्षीय व 48 वर्षीय महिलेचा, दत्तावडीतील 66 वर्षीय महिलेचा, शिवाजीनगरमधील 66 वर्षीय महिलेचा दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

शिवणेतील 76 वर्षीय महिलेचा देवयानी हॉस्पिटलमध्ये, कोंढवा खुर्दमधील 72 वर्षीय पुरुषाचा, मंगळवार पेठेतील 78 वर्षीय पुरुषाचा नायडु हॉस्पिटलमध्ये, हडपसरमधील 68 वर्षीय महिलेचा श्री समर्थ हॉस्पिटलमध्ये, वडगावशेरीतील 82 वर्षीय पुरुषाचा कमांड हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

फुरसुंगीतील 36 वर्षीय पुरुषाचा AICTS हॉस्पिटलमध्ये, कर्वेरोडवरील 67 वर्षीय पुरुषाचा रत्ना हॉस्पिटलमध्ये, धानोरीतील 70 वर्षीय महिलेचा, एअरपोर्ट रोडवरील 77 वर्षीय महिलेचा रुबी हॉल क्लिनिकमध्ये, औंधमधील 82 वर्षीय पुरुषाचा, कात्रजमधील 65 वर्षीय महिलेचा सह्याद्री हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.