Pune Corona Update : पुण्यात 224 नवे रुग्ण ; 241 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज : पुणे शहर आणि उपनगरात आज 224 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले. तर 241 कोरोनामुक्त नागरिकांना घरी सोडण्यात आले. रुग्णवाढीचा दर स्थिर असून मृत्यूदर घटत असल्याचे आशादायक चित्र आहे.

पुणे शहरात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 2 हजार 661 इतकी झाली आहे. दिवसभरात 4 कोरोनाबधित रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. 216 जण अतिगंभीर स्थितीत असून 300 जण ऑक्सिजन बेडवर उपचार घेत आहेत.

महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या आवाहनानुसार, पुणेकरांनी निर्धास्त न राहता घराबाहेर पडताना, विविध ठिकाणी वावरताना मास्क, हँड सॅनिटायजर आणि सोशल डिस्टंन्सिग नियमांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.

तसेच सौम्य ते तीव्र लक्षणे आढळल्यास तातडीने अँटीजेन, स्वॅब टेस्टींग करून खबरदारी घ्यावी. तसेच नजिकच्या रुग्णालयात औषधोपचार सुरू करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.