Pune Corona Update : पुण्यात 950 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज, तर 351 नवे रुग्ण

एमपीसीन्यूज : मागील काही दिवसांपासून पुण्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याचे चित्र दिसत आहे तर दुसरीकडे कोरोना मुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. मागील 24 तासात पुणे शहरातील तब्बल 950 रुग्ण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. तर 351 नवीन करूना बाधित रुग्ण सापडले आहेत.

तर दिवसभरात 25 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यातील 11 रुग्ण पुण्याबाहेरील आहेत. एकट्या पुणे शहरात आतापर्यंत 3844 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पुणे शहरात आतापर्यंत कोरोनाबधितांची रुग्णसंख्या 1 लाख 54 हजार 581 वर जाऊन पोहोचली. त्यातील 1 लाख 38 हजार 452 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

तर सद्यस्थितीत पुणे शहरात 12285 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 856 रुग्ण क्रिटिकल अवस्थेत आहेत. यातील 456 रुग्णांवर व्हेंटिलेटरवर उपचार सुरू आहेत.

संपूर्ण शहरात सध्या covid-19 चे रुग्ण सापडत असल्यामुळे नागरिकांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचं पालन करावं. या ठिकाणी जाणे शक्यतो टाळावे. अशावेळी चेहऱ्यावर मास्क असणे बंधनकारक करण्यात आले आहे.

तर सामाजिक अंतर ठेवून वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आह

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.