Pune Corona Update : 1830 नागरिक कोरोनामुक्त, 1617 नवे रुग्ण, 30 जणांचा मृत्यू

शहरात सध्या 891 क्रिटिकल रुग्ण असून, त्यात 529 जण व्हेंटिलेटरवर आहेत.

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाच्या आजारातून बरे होणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. शुक्रवारी तब्बल 1830 नागरिक या आजारातून मुक्त झाले. 6 हजार 723 कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 1617 नवे रुग्ण आढळले. 30 जणांचा मृत्यू झाला.

सध्या 891 क्रिटिकल रुग्ण असून, त्यात 529 जण व्हेंटिलेटरवर आहेत. कोरोनाचे पुणे शहरात 1 लाख 2 हजार 76 रुग्ण झाले आहेत. 83 हजार 915 रुग्णांनी वेळीच उपचार घेतल्याने कोरोनावर मात केली आहे.

आतापर्यंत या कोरोनामुळे 2 हजार 431 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 15 हजार 730 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.

कोथरूडमधील 84 वर्षीय पुरुषाचा, वारजेतील 65 वर्षीय पुरुषाचा, महात्मा फुले पेठेतील 63 वर्षीय पुरुषाचा देवयानी हॉस्पिटलमध्ये, रास्ता पेठेतील 86 वर्षीय महिलेचा पुना हॉस्पिटलमध्ये, कोथरूडमधील 58 वर्षीय पुरुषाचा, सिंहगड रोडवरील 68 वर्षीय पुरुषाचा, पर्वतीमधील 66 वर्षीय पुरुषाचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, कात्रजमधील 48 वर्षीय महिलेचा काशीबाई नवले हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

हडपसरमधील 65 वर्षीय महिलेचा शिवम हॉस्पिटलमध्ये, हडपसरमधील 68 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये, नारायण पेठेतील 75 वर्षीय महिलेचा, मार्केटयार्डमधील 82 वर्षीय पुरुषाचा संजीवन हॉस्पिटलमध्ये, लोहगावमधील 86 वर्षीय महिलेचा, महात्मा फुले पेठेतील 85 वर्षीय पुरुषाचा, धनकवडीतील 65 वर्षीय पुरुषाचा, येरवड्यातील 69 वर्षीय महिलेचा, बिबवेवाडीतील 74 वर्षीय महिलेचा, घोरपडी पेठेतील 62 वर्षीय पुरुषाचा, बिबवेवाडीतील 68 वर्षीय पुरुषाचा, विश्रांतवाडीतील 47 वर्षीय पुरुषाचा, फुरसुंगीतील 55 वर्षीय महिलेचा ससून हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

धनकवडीतील 85 वर्षीय महिलेचा तोडकर हॉस्पिटलमध्ये, वडगांवशेरीतील 74 वर्षीय पुरुषाचा, औंधमधील 57 वर्षीय महिलेचा, पाषाणमधील 72 वर्षीय पुरुषाचा बुधराणी हॉस्पिटलमध्ये, कात्रजमधील 72 वर्षीय पुरुषाचा नायडू हॉस्पिटलमध्ये, बिबवेवाडीतील 62 वर्षीय पुरुषाचा AICTS हॉस्पिटलमध्ये, सुभाषनगरमधील 77 वर्षीय पुरुषाचा जीवन ज्योती हॉस्पिटलमध्ये, फातिमानगरमधील 80 वर्षीय महिलेचा नोबेल हॉस्पिटलमध्ये, पाषाणमधील 53 वर्षीय पुरुषाचा सिम्बॉयसिस हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.