Pune Crime : पोलंडमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून अनेक तरुणांची फसवणूक

एमपीसी न्यूज – पोलंड या देशात नोकरी लावतो, असे आमिष दाखवून अनेक तरुणांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ऑगस्ट 2018 ते ऑक्टोबर 2020 या कालावधीत हा प्रकार घडला आहे.

अमोल कांबळे (वय 29, मंगलदास रोड) यांनी याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अमोल व त्याचे इतर चार मित्र यांना आरोपीने पोलंड या देशात नोकरी लावण्याचे आमिष दिले. आरोपीने फिर्यादीसह त्याच्या चार मित्रांकडून वेगवेगळ्या कारणासाठी एकूण 1 लाख 80 हजार रुपये घेतले. पैसे घेऊन देखील आरोपीने नोकरी मिळवून दिली नाही त्यामुळे फसवणूक झालेल्या तरुणाने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. आरोपीने अश्या प्रकारे अनेक तरुणांची फसवणूक केली असल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.