Pune Crime News : मोटारचालकाचे 49 लाख लुटणाऱ्याला सहा वर्षांनी अटक

एमपीसीन्यूज : पुणे-सातारा महामार्गावर मोटारचालकाला धमकावून 49  लाखांची लूट केल्या प्रकरणातील फरार आरोपीला दत्तवाडी पोलिसांनी सहा वर्षानंतर अटक केली.

गणेश दत्तोबा नेवसे, असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-सातारा महामार्गावर 2014 मध्ये मोटारचालकाला धमकावून 49 लाखांची रोकड लुटण्यात आली होती. या गुन्ह्यात काही आरोपींना अटक करण्यात आली होती. मात्र, गुन्ह्यात सहभागी झालेला आरोपी नेवसे पसार होता.

तो कात्रज, धायरी, पर्वती भागात राहत होता. पोलिसांकडून त्याचा माग काढण्यात येत होता. मात्र, तो वेगवेगळ्या भागात राहत असल्याने पोलिसांना आढळून येत नव्हता.

दरम्यान, टिळक रस्त्यावरील एका गल्लीत नेवसे थांबल्याची माहिती पोलीस हवालदार कुंदन शिंदे आणि सागर सुतकर यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केले.

ही कामगिरी दत्तवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर, गुन्हे शाखेचे निरीक्षक विजय खोमण यांच्या मार्गदर्शनाखाली स्वप्नील लोहार, सुधीर घोटकुले, महेश गाढवे, अमित सुर्वे, नवनाथ भोसले, शिवाजी क्षीरसागर, विष्णू सुतार, राहुल ओलेकर यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.