Pune Crime News : वृद्ध महिलेला चावल्याने दहा ते पंधरा जणांच्या टोळक्यांची कुत्र्यांना दगडाने मारहाण

एमपीसी न्यूज – वृद्ध महिलेला कुत्रे चावल्याचे कारण सांगत दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने कुत्र्यांना दगडाने मारहाण केली.

कोंढवा खुर्द येथील शिवनेरी नगर मध्ये 29 मे चा दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. रेणू स्वामीरन बॅनर्जी (वय 64) यांनी या प्रकरणी तक्रार दिली असून दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याविरुद्ध विरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी या कोंढव्यातील शिवनेरीनगरमध्ये राहतात. 29 मेच्या दुपारी दहा ते पंधरा जणांनी वृद्ध महिलेला कुत्रे चावल्याचे कारणावरून चिडून जाऊन फिर्यादी यांचे घराचे पत्र्याचे कंपाउंड दगड बांबूने मारून पाडले. त्यानंतर फिर्यादी यांना उद्देशून तुम कुत्ते को पालते हो, तुम्हारी कुत्तेने एक बुढी औरत को काटा है अब हम तुमको नही छोडेंगे असे म्हणून कंपाऊंडमध्ये असल्या कुत्र्यांना दगडाने मारहाण करून जखमी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.