_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Pune Crime News : उत्पन्नाच्या स्रोतापेक्षा अधिक संपत्ती बाळगल्या प्रकरणी भूमी अभिलेख विभागाच्या माजी उपसंचालकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – उत्पन्नाच्या स्रोतापेक्षा अधिक संपत्ती बाळगल्या प्रकरणी भूमी अभिलेख विभागाचे माजी उप संचालक आणि त्यांच्या पत्नी विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.

माजी उपसंचालक बाळासाहेब वामनराव वानखेडे (वय 58), त्यांच्या पत्नी उषाकिरण बाळासाहेब वानखेडे (वय 54) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

_MPC_DIR_MPU_II

याबाबत पुणे शहरातील मुंढवा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम 13 (1) (बी) सह 13 (2), भारतीय दंड विधान कलम 109 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सन 1989-90 ते सन 2019 या कालावधीत बाळासाहेब वानखेडे भूमी अभिलेख विभागाच्या पुणे प्रदेशचे उप संचालक म्हणून कार्यरत होते. बाळासाहेब आणि त्यांच्या पत्नीने 88 लाख 85 हजार 587 रुपये एवढी अपसंपदा धारण केली आहे. ही बाब लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या उघड चौकशीत निष्पन्न झाली आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाळासाहेब वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नावे पुणे शहर, मुंबई, अकोला व अमरावती या जिल्ह्यात मालमत्ता आहे. त्या मालमत्तांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून झडती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणाचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त विजयमाला पवार करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.