Pune Crime News : कोयता गॅंगची दहशत पुण्याच्या मध्यवस्तीतही, हातात कोयते घेऊन भरवस्तीत दोघांवर प्राणघातक हल्ला

एमपीसी न्यूज – पुण्यात कोयत्याने हाणामारी करण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहे. हडपसर, सिंहगड, खडकी या परिसरात कोयता गँगने (Pune Crime News) दहशत पसरवण्याच्या घटना ताज्या असतानाच पुण्याच्या भरवस्तीत देखील असाच प्रकार घडला. खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घोरपडे पेठेत सात ते आठ जणांच्या टोळक्याने पाठलाग करून दोघांवर कोयत्याने वार केले. या घटनेत दोघे गंभीर जखमी झाले. 22 डिसेंबर रोजी हा प्रकार घडला. 

योगेश दत्तात्रय चव्हाण (वय 38), सूरज संतोष कोल्हे (वय 19), मुकेश इंद्रजीत उंबरे (वय 19), विशाल अंकुश मुजमुले (वय 19) यांच्यासह आणखी तिघांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओमकार महेश थोरात (वय 22) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. खडक पोलीस ठाण्यात (Pune Crime News) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी हे मित्रांसोबत घोरपडे पेठेत थांबले होते. आरोपी योगेश चव्हाण यांनी त्यांना शिवीगाळ करत तुम्ही बघेल तेव्हा कॉलनीत का येता, असा जाब विचारला. त्यावेळी फिर्यादी यांनी ‘तू कोण विचारणारा’, असे म्हणाल्याने दोघांत वाद झाले.

‘तू कॉलनीमध्ये आला आहेस पण परत जिवंत जाणार नाहीस’, असे म्हणून निघून गेला. त्यानंतर तीन दुचाकीवरून बाईक वरून आपल्या मित्रांना घेऊन आला. आणि कोयत्याने आणि पालघनने फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांना मारहाण (Pune Crime News) करण्यास सुरुवात केली.

Nighoje Murder : निघोजे येथे ‘दृश्यम’ स्टाईलमध्ये वडिलांचा खून; दोन मुलांना अटक

फिर्यादी हे घोरपडे पेठेतून जीवाच्या आकांताने पळत होते. आरोपी त्यांना मारण्यासाठी हातात कोयते आणि पालघर घेऊन त्यांचा पाठलाग करत होते. जीव वाचवण्यासाठी फिर्यादी एका बिल्डिंगमध्ये लपून बसले.

आरोपींनी त्या ठिकाणीही जाऊन तुला आज जिवंत ठेवणार नाही असे बोलून पालघर आणि कोयत्याने त्यांच्यावर वार केले. तर दुसऱ्या एका आरोपीने त्यांच्या पोटात चाकू खुपसला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून चौघांना अटक केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.