Pune Crime News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याने अश्लील व्हिडीओ तयार करून वर्षभर बलात्कार केला, पीडित महिलेची पत्रकार परिषदेत माहिती

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे परभणीतील नेते राजेश विटेकर यांच्यावर एका महिलेने लैंगिक अत्याचाराचा आरोप केला. अधिकाऱ्यांनी या महिलेचे अश्लील व्हिडिओ तयार करून वर्षभर लैंगिक अत्याचार केला असल्याचे या महिलेचे म्हणणे आहे. या महिलेने सांगितल्यानुसार तिने यासंदर्भात तक्रारही केली होती, या प्रकरणाचे पुरावेही या महिलेकडे आहे, परंतु मला केवळ तपास सुरू असल्याचे सांगितले जाते. तर राजेश विटेकर यांनी शरद पवार यांच्या पाठबळामुळे माझ्यावर गुन्हा दाखल होणार नाही, असे सांगून मला घाबरवल्याचे ही या पीडित महिलेचे म्हणणे आहे.

पुण्यात या महिलेने भुमाता ब्रिगेड चे अध्यक्ष तृप्ती देसाई यांच्यासह पत्रकार परिषद घेऊन आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराचा पाढा वाचला. या सर्व प्रकारामुळे पुन्हा एकदा राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. या सर्व प्रकारामुळे महाविकास आघाडी सरकारचा समोरही अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राजेश विटेकर हे परभणी जिल्हा परिषद अध्यक्ष राहिले आहेत. परभणी लोकसभा मतदार संघातून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. च्या निवडणुकीत त्यांचा शिवसेना उमेदवाराकडून पराभूत झाला होता. या महिलेने भर पत्रकार परिषदेत केलेल्या आरोपामुळे राष्ट्रवादी काँग्रेस राजेश विटेकर यांच्याविरोधात काय कारवाई करणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत..

दरम्यान यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, सामाजिक कल्याण मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप झाले होते. या महिलेने महबूब शेख यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता ती महिला तृप्ती देसाई यांना ही येऊन भेटली होती. धनंजय मुंडे प्रकरणातही राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका होत असतानाच मुंडे यांनी आपल्या आयुष्यातील महिलेविषयी जाहीर वाच्यता केली त्यानंतर आरोप करणाऱ्या महिलेने ही तक्रार मागे घेतली होती.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.