Pune Crime News : राहुल नेने खून प्रकरणाचा अखेर उलगडा, सिंहगड रस्ता परिसरातून दोघांना अटक

एमपीसी न्यूज – हडपसर परिसरातील एका कालव्यात दोन दिवसांपूर्वी राहुल श्रीकृष्ण नेने (वय 46) यांचा मृतदेह सापडला होता. शवविच्छेदन अहवालात डोक्यात दगड घालून हा खून केला असल्याचे निष्पन्न झाले होते. या खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले असून सिंहगड रस्ता परिसरातून दोघांना अटक करण्यात आली.

सतीश संजय सुतार आणि मिलिंद पवळे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की हडपसर परिसरातील एका कालव्यात नेने यांचा मृतदेह सापडला होता. बेदम मारहाण केल्यानंतर डोक्यात दगड घालून त्यांचा खून करण्यात आल्याचे उघडकीस आले होते. हडपसर पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली होती.

तपासादरम्यान नेने हे सिंहगड भागात राहत असल्याची माहिती मिळाली. 13 मार्च रोजी  घरातून बाहेर पडल्यानंतर बेपत्ता झाले होते. पोलिसांनी त्यानंतर सिंहगड रस्त्यावरील संतोष हॉल राजाराम पूल आणि दांडेकर पूल परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले होते.

त्यातील एका सीसीटीव्ही फुटेज मध्ये आरोपी नेने यांना दुचाकीवरून घेऊन जात असल्याचे दिसले होते. त्यानंतर पोलिसांनी सुतार आणि पवळे यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या अधिक चौकशी त्यांनी नेने यांना मारहाण करून सिंहगड रस्त्यावरील एटीएम मधून त्यांच्या खात्यातील पैसे काढून घेतले. त्यानंतर ते याची माहिती पोलिसांना देतील या भीतीने त्यांनी नेने यांना पर्वती परिसरात घेऊन जातात त्यांचा खून केला आणि मृतदेह कालव्यात फेकला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.