Pune Crime News : सातबारा उतारा देण्यासाठी 8 हजारांची लाच स्वीकारताना तलाठी जाळ्यात

एमपीसी न्यूज – वारसाची नोंद घेऊन सातबारा उतारा देण्यासाठी 10 हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 8 हजार रुपये स्वीकारणाऱ्या तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रंगेहात पकडले. पुण्यातील नळ स्टॉपजवळील पौड रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली.

राजेश उत्तम गायकवाड (वय 40) असे याला लाचखोर लाचखोर तलाठ्याचे नाव आहे. याप्रकरणी एका महिलेने तक्रार दिली होती.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, तक्रारदार या महिला वकील आहेत. त्यांच्या अशिलाच्या वारसाची नोंद घेऊन सातबारा उतारा देण्यासाठी तलाठी गायकवाड यांनी दहा हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडी अंती आठ हजार रुपये स्वीकारण्याचे ठरले. दरम्यान तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला याची माहिती दिली.

लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी तक्रारीची खातरजमा करत संबंधित तलाठ्याला पकडण्यासाठी पौड रस्त्यावरील नळ स्टॉप परिसरात सापळा रचला होता. त्यानंतर आज सायंकाळच्या सुमारास लाच स्वीकारताना गायकवाड त्याला रंगेहाथ पकडले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.