Pune Crime News : किरकोळ कारणावरून रिक्षा चालकाने दुचाकीस्वाराचे दात पाडले

एमपीसीन्यूज : रिक्षा चालकास कट मारल्याचा जाब विचारणे एक तरुणास चांगलेच महागात पडले. चिडलेल्या रिक्षा चालकाने रस्त्यावरील दगड फेकून मारल्याने तरुणाचे समोरचे दोन दात पडले.

याप्रकरणी तोहीब शेख (रा.लोहगाव) याच्याविरुध्द विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

फिर्यादी सुमित शेळकंदे (21,रा.धानोरी) हा त्याच्या दुचाकीवरुन मित्राचे उसने घेतलेले पैसे देण्यासाठी जात होता. धानोरी – लोहगाव रस्त्यावर शेखच्या रिक्षाने त्याला कट मारल्याने तो दुचाकीसह खाली पडला. याचा जाब सुमितने शेखला विचारला.

‘तुला रिक्षा नीट चालवता येत नाही का?’, अशी विचारणा त्याने केली. याचा राग मनात धरुन शेखने रस्त्यात पडलेला दगड सुमितला फेकून मारला. यामध्ये सुमितचे समोरचे दोन दात पडले.

पोलिस उप निरीक्षक लहू सातपुते करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.