Pune Crime News : पुण्यात दूध आणण्यासाठी निघालेल्या महिलेचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

एमपीसी न्यूज – दूध आणण्यासाठी दुचाकीवर चाललेल्या महिलेला भरधाव वेगातील वाहनचालकाने दिलेल्या धडकेत गृहिणी ठार झाली. हा अपघात काल सकाळी सातच्या सुमारास लोहगावमधील निंबाळकरनगर परिसरात घडला.

लक्ष्मी बालाजी कांबळे (वय 30 रा. लोहगाव) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल सकाळी सात वाजण्याच्या सुमारास लक्ष्मी दुकानातून दुध आणण्यासाठी दुचाकीवरून चालल्या होत्या. त्यावेळी भरधाव वेगातील वाहनचालकाने त्यांना धडक दिली. त्यामुळे गंभीररित्या जखमी झाल्यामुळे लक्ष्मीचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीस उपनिरीखक अशोक गांधले तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.