Pune Crime News : दारूचे पैसे मागताच कामगाराला बेदम मारहाण  

एमपीसी  न्यूज-  दारूचे  आणि पाण्याच्या बाटलीचे पैसे मागितल्याच्या रागातून बिअरबारमधील कामगारासह दोघांना बेदम मारहाण करत त्यांच्यावर कोयत्याने वार केल्याची घटना हडपसर परिसरात घडली. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.

 

याप्रकरणी सागर बाळासो आटोळे (वय २०) आणि तन्म अजित बेडगे (वय २३,  रा. ससाणेनगर, हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. लक्ष्मण झिंजुर्डे असे जखमी झालेल्या कामगाराचे नाव आहे. याबाबत दीनेश रघुपती नल्ला (वय ४०, रा. गुरूवार पेठ)  यांनी हडपसर पोलीसांत तक्रार दिली आहे.

 

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसरमधील अमरसिद्धी कॉम्प्लेक्समध्ये तक्रारदारांचे बिअरबार असून त्याठिकाणी लक्ष्मण झिंजुर्डे हा कामगार म्हणून काम करतो. तक्रारदार हे काऊंटरवर बसलेले होते. त्यावेळी लक्ष्मण याने सागरकडे दारू व पाण्याच्या बाटलीचे पैसे मागितले. त्याचा राग आल्याने त्यांनी बारमध्ये परत येऊन लक्ष्मण याच्यावर कोयत्याने वार करून त्याला जखमी केले. तक्रारदार सोडविण्यास गेले असता त्यांच्यावरही वार  केला. अधिक तपास हडपसर पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.