Waste Water Management : सांडपाण्याचे नियोजन, घनकच-याचे व्यवस्थापन न केल्याप्रकरणी हॉटेल व्यावसायिकांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – हॉटेल मधील सांडपाणी (waste water management) इतरांच्या जागेत सोडले. हॉटेल मधील घनकच-याचे नियोजन न करता तो इतरांच्या जागेत टाकला. याप्रकरणी हॉटेल व्यवसाय करणा-या पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शनिवारी (दि. 4) सकाळी दत्तवाडी नेरे येथे घडला.

पौर्णिमा जालिंदर शितोळे, जालिंदर शितोळे (दोघे रा. दत्तवाडी, ता. मुळशी), गाडे (रा. वाकड), गोरक्षनाथ बन्सी जाधव (रा. दत्तवाडी, ता. मुळशी), विमल बन्सी जाधव (रा. दत्तवाडी, ता. मुळशी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी भरत शांताराम जाधव (वय 30, रा. नेरे दत्तवाडी, ता. मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Safe food : स्वच्छ, सुरक्षित अन्नाची जबाबदारी फेरीवाल्यांची – काशिनाथ नखाते

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींचे नेरे दत्तवाडी येथे यारा द जंक्शन हॉटेल आहे. त्यांनी हॉटेलचे सांडपाणी (waste water management) फिर्यादी यांच्या जागेत सोडून दिले. तसेच हॉटेलचा कचरा फिर्यादी यांच्या जागेत टाकून फिर्यादी यांना शिवीगाळ, दमदाटी केली. हॉटेलच्या सांडपाण्याचे व घनकच-याचे नियोजन व व्यवस्थापन करणे गरजेचे असताना देखील ते केले नाही. फिर्यादी यांच्या जागेत उत्खनन केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.