Tamanna Sheikh : महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत यश प्राप्त केलेली तमन्ना शेख हिचा सन्मान 

एमपीसी न्यूज : क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एजुकेशन फाउंडेशनच्या वतीने थेरगावच्या तमन्ना शेख (Tamanna Sheikh) हिची नायब तहसीलदार पदी निवड झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला.

स्पर्धा परिक्षेमध्ये (2021-22 ) तमन्ना शेख हिने उत्कृष्ट असे यश मिळवले व नायब तहसीलदार पदी तिची निवड झाली. त्यामुळे संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, सामाजिक कार्यकर्ते इरफान शेख, इकबाल शेख यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

तमन्नाच्या घरची परिस्थिती बिकट असून तिची आई शिवणकाम करून कुटुंबाला हातभार लावते, तर वडील फोर्स मोटर्स कंपनीत कामगार आहेत. थेरगाव येथील आनंदवन सोसायटीत राहणाऱ्या तमन्ना हिने कुठलाही क्लास न लावता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली व तिसऱ्या प्रयत्नामध्ये मुलींमध्ये राज्यात 8 वी, सर्वसाधारण गटात 106 वी येऊन तिची नायब तहसीलदार पदी (Tamanna Sheikh) निवड झाली.

HSC Result 2022 : मोठी घोषणा! उद्या लागणार बारावीचा निकाल

 ”मुस्लिम समाजामध्ये शिक्षणाबद्दल जागरूकता कमी आहे, मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवले जाते. त्यामुळे मुस्लिम महिला संवेदनशील असतात. त्यांनी जातीच्या बुरख्यातून बाहेर पडून पुढील पिढीला शिक्षणासाठी प्रोत्साहित करावे व नवीन पिढीला आगळा वेगळा आदर्श निर्माण करावा.” असे उद्गार संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार यांनी काढले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.