Pune Crime : पेट्रोल पंपावर दरोड्याचा प्रयत्नात असलेल्या दरोडेखोरांना अटक

एमपीसी न्यूज : पुणे पोलिसांनी कोंढवा परिसरातील पेट्रोल पंपावर (Pune Crime) दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला असून, या गुन्ह्यात चार जणांच्या टोळीला अटक केली आहे. आरोपींकडे धारदार शस्त्रे आढळून आली असून ते पिसोळी परिसरातील धर्मावत पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत होते.

कोंढवा पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीद्वारे पोलिसानी परिसरात गस्त घातली आणि आरोपीना अटक करण्यात आली.

Pune News : पुणे शहरातील या भागात गुरुवारी पाणीपुरवठा बंद

महेश बबन गजेसिंग, रितेश आबा खारव, माधव नारायण अंकुशे आणि महेंद्र नानासाहेब पाटील अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी या टोळीकडून दोन धारदार कोयते, एक धारदार तलवार, चार दुचाकी, मिरची पूड असा एकूण सुमारे 3 लाख 80 हजार 450 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश बबन गजेसिंग यांच्यावर पूर्वीही गुन्हे दाखल आहेत.

सर्व आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा (Pune Crime) दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.