PCMC : बॅडमिंटन स्पर्धेसाठी महापालिकेने दिले 20 लाख रुपये

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेने महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन, बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने आणि पुणे जिल्हा मेट्रोपॉलिटन (PCMC) बॅडमिंटन असोसिएशनच्या (पीडीएमबीए) वतीने राष्ट्रीय वरिष्ठ गट बॅडमिंटन स्पर्धा 2023 या स्पर्धेसाठी सह आयोजकत्व स्वीकारले आहे. त्यासाठी 20 लाख रुपयांचा निधी दिला आहे.

अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी 20 लाख रकमेचा धनादेश पुणे जिल्हा  मेट्रोपॉलिटन बॅडमिंटन असोसिएशन यांचे नावे या संस्थेचे सह कार्यवाह राजीव बाग यांचेकडे सुपूर्द केला. यावेळी सहशहर अभियंता संजय कुलकर्णी, प्रभारी क्रीडा अधिकारी अनिता केदारी, राजेंद्र नागपुरे, जनसंपर्कचे प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.

Pune Crime : पेट्रोल पंपावर दरोड्याचा प्रयत्नात असलेल्या दरोडेखोरांना अटक

सदर स्पर्धेत अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू सहभागी होणार आहेत. त्यातील महाराष्ट्राच्या संघातून मालविका बनसोड, चिराग शेट्टी हे दोघे सहभागी होणार आहेत (PCMC) त्याचबरोबर एच एस प्रनोय, लक्ष्य सेन, कीदांबी श्रीकांत, अश्रीत कश्यप, गायत्री गोपीचंद, त्रेसा जॉली, ध्रुव कपीला इ. खेळाडू सहभागी होणार आहेत, अशी माहीती पुणे जिल्हा मेट्रोपॉलिटन बॅडमिंटन असोसिएशनचे सहकार्यवाह राजीव बाग यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.